नवी दिल्ली : अल कायदा आणि इसिसच्या संघटनांनी सप्टेंबर, ऑक्टोबरमधील पवित्र सणांच्या काळात ज्यु आणि इस्त्रायली समुहांवर हल्ले करण्याचा कट आखला आहे. गुप्तचर खात्याने ज्यु नागरिकांची वस्ती असणाऱ्या राज्यांना याबाबत सतर्कतेचा संदेश पाठवला आहे.
अल कायदा आणि ज्यू नागरिकांची वस्ती, त्यांची प्रार्थनास्थळे तसेच अन्य ठिकाणअंवर हा हल्ला करण्याचा हा कट आहे. सप्टेबर आणि ऑक्टोबर महिन्यात रोश हशनाह (ज्युंचे नवे वर्ष) 29 सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरला साजरे होणार आहे. योम किप्पूर जा ज्यु धर्मियांचा सर्वात पवित्र दिवस आठ आणि नऊ ऑक्टोबरला आहे. सुक्कोट हा सण 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील इस्त्रायली दुतावासासह इस्त्रायली नागरिकांचा वावर असणारी हॉटेल आणि शाळा यांनाही लक्ष्य बनवण्याची शक्यता आहे, अशी माहिती अन्य देशातील गुप्तचर खात्यांनी आपल्या गुप्तचर यंत्रणांना दिली आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्या कृतीला इस्त्रायलने पाठी।बा दिला होता. त्याचा बंदला घेण्यासाठी हा कट रचला आहे. गुप्तचर खात्याने स्थानिक पोलिसांना याबाबतचा इशारा दिला आहे. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तसेच ते टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. या नंतर दिल्लीतील दुतावास आणि ज्यू तसेच इस्त्रायली नागरिकांच्या वस्ती, छबाड हाऊस येथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.