सातारा -जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 177 नागरिकांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, 392 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 30, कराड येथील 12, फलटण येथील 25, कोरेगाव येथील 25, वाई येथील 22, खंडाळा येथील 25, रायगाव येथील 18, पानमळेवाडी येथील 46, मायणी येथील 13, महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 12, खावली येथील 33, तळमावले येथील 9, म्हसवड येथील 19, पिंपोडा येथील 7
तरडगाव येथील 31 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 60 असे एकूण 392 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.