वाघोली- येथे घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास लोणीकंद पोलिसांच्या डी. बी. पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अजय सतीश दुशिंग (वय 22, रा. चिखली), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील यशवंतनगर येथे अजय दुशिंग हा घरफोडीचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पेट्रोलिंगवरील डी बी पथकातील पोलिसांना समजले.
पथकाने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्यास पकडले. दुशिंगला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर चौकशी केली असता त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी केसनंद येथील साई हिल्स सोसायटीमध्ये दरवाजा कटावणीने उचकटून घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने कबूल केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत (गुन्हे) यांनी गुन्हे शोध पथकांच्या मदतीने अटक केले. ही कारवाई पोलीस हवलदार बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे,सूरज वळेकर यांनी केली.