आमदार चेतन तुपे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : वैभवशाली परंपरा असलेला पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक भावविश्वात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. गणेशोत्सव काळात पुण्यात होणाऱ्या कार्यक्रम, उपक्रमांची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत सन्मानपूर्वक दखल घेतली जाते.मात्र, मागील शासनाच्या काळात गणेशोत्सव कार्यकर्त्यांवर किरकोळ कारणे दाखवून आकसाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून या कार्यकर्त्यावरील गुन्हे तातडीनं मागे घेण्यात यावेत अशी मागणी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही कार्यकर्ते आणि नेते घडविणारी विद्यापीठे आहेत. असा उल्लेख राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रक्रमाने केला जातो. राज्याच्या आणि देशाच्या समाजकारण-राजकारण क्षेत्रात आपली छाप पाडणान्या अनेक नेत्यांची जडणघडण गणेशोत्सव मंडळांमधूनच झालेली आहे. कार्यकर्त्यांवर आकसाने गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारामुळे कार्यकत्यांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळे कार्यकर्त्यांना निष्कारण कोटाचे हेलपाटे घालावे लागत असल्याने त्यांना त्रास होत आहे. यामध्ये अनेक सुशिक्षित, होतकरू तरूणांचे जीवन उधवस्त होण्याची भिती आहे. ही बाब लक्षात घेऊन आरे कारशेड कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या आपल्या निर्णयाप्रमाणेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर मागील भाजप रकारने गणेशोत्सव काळात दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी संबधितांना आदेश द्यावेत अशी मागणी तुपे यांनी आपल्या पत्रात केली आहे.