खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी जेरबंद
पुणे,दि.1- खुनाच्या गुन्हयात चार महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस समर्थ पोलिसांनी जेरबंद केले. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
मोहसीन इजहार अन्सारी (23,रा.सय्यदनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
नाना पेठेत बांगडी विक्रीचा स्टॉल असलेल्या महिलेच्या डोक्यात काचेच्या तुकड्याने वार करुन तीच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. ही घटना 18 एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर एकून पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले. मात्र या गुन्ह्यात सहभागी असलेला मोहसीन फरार होता. तो घरसोडून दुसरीकडे रहाण्यास गेला होता. त्याचा समर्थ पोलीसांचे पथक शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे , पोलीस शिपाई निलेश साबळे, सुमीत खुट्टे, सचिन पवार,गणेश कोळी, महिला पोलीस शिपाई पाडेकर यांना तो शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसार शनिवारी सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. तो सायंकाळी पाचच्या सुमारास सापडला. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक(गुन्हे)विनायक साळुंके करत आहेत.