चिंबळी- लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंबळी (ता. खेड) येथे भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेत मतदारांचे आभार मानले. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिशबाजी करीत डॉ. कोल्हेंचे स्वागत केले. तर महिलांनी त्यांचे औक्षण करीत त्यांचे अभिनंद केले. यावेळी हभप हिरामण गवळी, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांच्या हस्ते डॉ. कोल्हे यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी सरपंच रामचंद्र कातोरे, ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब बटवाल, अध्यक्ष अर्जुन जाधव, हेमंत जैद, दादासाहेब जैद, ज्ञानेश्वर कड, संतोष कातोरे, शंकर पांडुरंग जैद, सुरेश जगनाडे, लक्ष्मण कातोरे, पंडित कड, गणेश जाधव, राहुल चव्हाण, नेमीनाथ बटवाल, प्रशांत जैद, संभाजी अवघडे, अमित जाधव, छबू खंडागळे, हिरामण बहिरट, सुनंदा जगनाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.