दिल्ली का कायद्यावरून राजधानीत हिंसाचार, दगडफेक सुरू
नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायद्या विरोधातील निदर्शक आणि या कायद्याचे समर्थक यांच्यातील चकमक दुसऱ्या दिवशी सुरूच राहिल्या. यात दोन घरे पेटवून देण्यात आली. दोन्ही गटांनी परस्परांवर तुफानी दगडफेक केली. यात जखमी झालेल्यांची नेमकी संख्या समजू शकली नाही.
शहरातील जाफराबाद भागात दोन्ही बाजूचे जमाव रविावारी आमने सामने आल्याने या संघर्षाला सुरवात झाली. मोठ्या संख्येने जमलेल्या निदर्शकांनी रस्ता रोखला. अशीच निदर्शने राजधानीत अन्य ठिकाणीही सुरू झाली.
उत्तर पूर्व दिल्लीत निदर्शकांनी दोन घरे पेटवून दिल्याने तणाव निर्माण झाला. जाफराबाद आणि मौजपूर येथून अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळावर पाठवण्यात आले. मात्र सोमवारी पुन्हा या दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. चांदबाग भागातही हिंसाचर उफाळल्याचे वृत्त हाती येत आहे.
त्या भागात आग लागल्याचा दूरध्वनी आल्याने पाठवण्यात आलेल्या अग्निशामक दलाच्या बंबची नासधूस करण्यात आली, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर जाफराबाद मौजपूर-बाबरपूर ही दोन मेट्रोस्थानके बंद करण्यात आली. या स्थानकावर रेल्वे थांबणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने जाहीर केले.
Tension escalated in northeast Delhi with protesters torching at least two houses