नवी दिल्ली : भारतीयांच्या स्वीस बॅंकेतील खात्यांचा तपशील असणाऱ्या कागदपत्रांचा पहिला संच भारत सरकारला माहिती देवाणघेवाण योजनेतून मिळाला असल्याचे स्वीत्झर्लंड सरकारने सोमवारी जाहीर केले.
या योजनेतून भारताला स्वीस बॅंकेच्या खात्याचा तपशील आता स्वयंचलीत पध्दतीने मिळणार आहे. सध्या कार्यरत असणारी खाती, आणि 2018मध्ये बंद करण्यात आलेली यांचा तपशील मिळणार आहे. कागदपत्रांचा पुढील संच सप्टेंबर 2020मध्ये मिळणार आहे. भारतीय कर प्रशासनाला 2018च्या सुरवातीपासून भारतीयांच्या स्वीस बॅंकेतील खात्यातील तपशील देणंयासाठी अनेक संच तयार करावे लागतील, असे संकेत तेथील केंद्रीय कर कार्यालयाने दिले आहेत..भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये बॅंक खात्यांचा तपशील देण्यासाठी 206 मध्ये करार झाला. त्याची अंमलबजावणी जानेवारी 2018पासून सुरूवात झाली.