इन्स्टाग्रामने आपल्या रील्स प्लॅटफॉर्मवर टिकटॉकचे एक दमदार फिचर जोडले आहे. इन्स्टा म्हणाले की, आता तुम्ही रील्समध्ये रिमिक्स फिचर वापरू शकता आणि आधीचा व्हिडिओ वापरून तुमचा नवीन व्हिडिओ बनवू शकता. येथे आपण आपली प्रतिक्रिया देऊ शकता.
रील्स रिमिक्स आता वापरकर्त्यांना ही परवानगी देईल जेथे ते आधीपासून उपलब्ध दुसऱ्या वापरकर्त्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊ शकतात आणि स्वत:चा व्हिडिओ बनवू शकतात. यात आपले नृत्य किंवा गाणे समाविष्ट असू शकते. आपण हे सर्व मूळ व्हिडिओच्या पुढे करू शकता आणि नंतर ते रील्स रिमिक्स करू शकता.
रील्स रिमिक्स बनवण्यासाठी प्रथम तीन डॉट मेनूवर क्लिक करावे लागेल आणि नंतर रिमिक्स धिस रील निवडावे. येथे एक नवीन व्हिडिओ अपलोड करू शकता किंवा जुना व्हिडिओ जोडू शकता. येथे बॅकग्राउंड म्युझिकदेखील बदलू शकता.
यानंतर एडिट व्हिडिओ, रिमूव्ह बॅकग्राऊंड आणि व्हॉइस ओव्हर देखील जोडू शकता. यानंतर आपल्याला प्रोफाइल सेटिंग्जवर जावे लागेल आणि नंतर आपल्या रील्सचे रिमिक्स करावे लागेल. आपल्याकडे आधीपासून रील सेव्ह असल्यास आपण रिमिक्स करून अपलोड करू शकता.