जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आंदोलन
रेडा- शिक्षकांनी एकच मिशन, जुनी पेन्शन, अशी घोषणा देत इंदापूर तालुक्यातील 10 शिक्षक संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. इंदापूर तालुक्यातील सर्व शिक्षकांनी एकत्र येत तहसीलदार सोनाली मेटकरी व पंचायत समिती गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांना मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, शिक्षक व शिक्षकेतर संघटना, इंदापूर तालुका समन्वय समितीसह 10 शिक्षक संघटना यात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी विविध संघटनेचे ज्ञानदेव बागल, नाना नरुटे, अनिल रूपनवर, सुहास मोरे, सहदेव शिंदे, बाळू चव्हाण, केंद्र प्रमुख संभाजी आजबे, संतोष हेगडे, इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे सभापती किरण म्हेत्रे, प्रवीण क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी आंदोलनास पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष तानाजी धोत्रे यांनी पाठिंबा दिला.