रेडा- देशभरात सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा व पत्रकारांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते सौरभ शिंदे याने 1717 मास्कचे वाटप केले आहे. आणखी 5 हजार मास्कचे वाटप करणार असल्याची माहिती सौरभ शिंदे यांनी यावेळी दिली. शहरातील समाजकार्यात अग्रेसर असणारे कार्यकर्ते विनोद राऊत, प्रीतम भालेराव, अजहर पटेल, अभिषेक चव्हाण, कृष्णकांत खटावकर, शुभम नलवडे, अमित शिंदे हे मास्कचे पाकीट निर्जंतुकीकरण करून तयार करतात.