मेष : शुक्राची साथ दिलासा देईल. नवीन मोठया खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. सर्व कार्यात यश मिळेल.
वृषभ : बेकारांना नवीन नोकरी मिळेल. नोकरदारांना विशेष लाभ होतील. महिलांनी घाईने निर्णय घेऊ नयेत.
मिथुन : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिक व सामाजिक कामात विशेष रस घ्याल.
कर्क : अर्थप्राप्ती मनाप्रमाणे होईल. व्यवसायात अनपेक्षित लाभाची शक्यता परदेशगमनाची संधी येईल.
सिंह : नोकरीत बदलीस अनुकूल वातावरण लाभेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. हितचिंतकांची साथ मिळेल.
कन्या : महिलांना आवडत्या छंदातून प्रसिद्धी मिळेल. मंगलकार्य घरात ठरतील. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल.
तूळ : मानसिक आरोग्य चांगले राहील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टांचे चीज आता होईल.
वृश्चिक : अनुभवांचा उपयोग होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत तणावाचे वातावरण दूर होईल.
धनू : वरिष्ठांचे झालेले गैरसमज दूर होतीलर. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांचे आरोग्य चांगले राहील.
मकर : आवडीच्या क्षेत्रात मन रमेल. विद्यार्थ्यांना अभ्यासास पूरक ग्रहमान लाभेल. कामे मनाप्रमाणे होतील.
कुंभ : सुप्त इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. बराच काळ रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील. अपेक्षित पत्रव्यवहार होतील.
मीन : व्यवसायात परिस्थितीनुसार तडजोडीचे धोरण ठेवावे. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल.