हरियाणा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिला आणि अल्पवयीन मुलाला मारहाण करत त्यांची चपलांचा हार घालून धिंड काढल्याची घटना हरियाणा मधील करनाल येथे घडली आहे. या दोघांना गावाबाहेर काढण्याचे आदेशही पंचायतीने दिले असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकारांची दाखल पोलिसांनी घेतली असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पीडित महिला ही मूळची बिहार मधील असून मुलगा बारावीमध्ये शिकत आहे. सदरील महिला विवाहित असून तिला मुलं देखील आहेत. “घटनेचा व्हिडीओ मी पहिला नसून पंचायतीत झालेल्या निर्णयाची मला कल्पना नाही”. असे मत तेथील माजी सरपंचानी व्यक्त केले आहे. तर चपलांचा हार घालून धिंड काढण्यास सरपंचाचा विरोध होता. तेथील बंजारा समाजाच्या लोकांनी मुलास मारहाण केल्याचा व मुलाची हत्या करण्याचा ग्रामस्थांचा कट असल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.