नगर – जिल्ह्यासह शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे करोनावर उपचार सुरु असलेले बुथ हॉस्पिटल हाऊसफुल झाले आहे. करोना रुग्ण बरे होण्यासाठी बुथ हॉस्पिटल मध्ये जीव धोक्यात घालून सतत कार्यरत असणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले गरजेचे ऍप्रन व सॅनिटायझरची भेट अक्षरश: सेवाप्रितच्या वतीने देण्यात आली.
सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय व प्रकल्प प्रमुख अर्चना खंडेलवाल यांनी करोना महामारीच्या संकटात नगरकरांसाठी मोठा दिलासा व आधार ठरलेल्या बुथ हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक करुन हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांचा सन्मान केला.
यावेळी ओबेरॉय म्हणाल्या की, स्वत:चे जीव धोक्यात घालून बुथ हॉस्पिटल मध्ये डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी करोनाच्या लढ्यात परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. कोणतीही भिती मनात न ठेवता सर्व कर्मचारी कर्तव्य, समर्पण व सेवाभावाने करीत असलेले कार्य अतुलनीय आहे.
प्रशासक कळकुंबे यांनी करोनाला न घाबरता नियमांचे पालन करुन त्यावर मात मिळवता येणार आहे. यावेळी अंजली महाजन, अंजली राठी, अनुजा जाधव, अर्चना कुलकर्णी, सारिका मुथा, लता राजोरीया, अर्चना मुथा, अश्विनी गोलांदे, बबीता खंडेलवाल, देविका खंडेलवाल, मोनिका ताथेड, डिंपल शर्मा, संध्या जोशी, जया खंडेलवाल, कल्पना खंडेलवाल, मंजू झालानी, ममता खंडेलवाल, प्रिया गांधी, राजू बंम्ब, राखी कोठारी, रेखा बम्ब सहकार्य लाभले.