#INDvENG 3rd Test 2nd Day : जो रूटचा बळींचा ‘पंच’, भारताचाही पहिला डाव गडगडला

अहमदाबाद – भारतीय संघाचा पहिला डाव 145 धावसंख्येवर आटोपला आहे. यासह भारताने 33 धावांची आघाडी मिळवली आहे.  भारताकडून रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करताना 66 धावांची खेळी केली. रोहित वगळता अन्य एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. विराटने 27 धावा केल्या.
 
भारताने अखेरच्या 7 विकेट्स अवघ्या 46 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. भारतीय संघाने  3 बाद 99  या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र यानंतर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मैदानावर फार काळ टिकू दिलं नाही . कर्णधार जो रुटने इंग्लंडकडून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर जॅक लीचने 4 फलंदाजांना माघारी पाठवत रुटला चांगली साथ दिली.
#INDvENG 3rd Test Second Day : जो रूटचा बळींचा ‘पंच’, भारताचाही पहिला डाव गडगडला
भारताचा पहिला डाव 145 वर आटोपला
– पहिल्या डावानंतर भारताकडे फक्त 33 धावांची आघाडी
– जो रूटचा बळींचा पंच
– रोहित शर्मांची अर्शतकी खेळी, इतर फलंदाज अपयशी
-पूजारासह अक्षर पटेल, वाॅश्गिंटन सुंदर शून्यावर बाद
#IND (पहिला डाव) – 145/10(53.2)
भारत फलंदाजी – रोहित 66(96), गिल 11(51), पूजारा 0(4), विराट 27(58), रहाणे 7(25), पंत 1(8), अश्विन 17(32), सुंदर 0(12), अक्षर पटेल 0(2), इशांत (नाबाद) 10*(20)
 
इंग्लंड गोलंदाजी (पहिला डाव) – जो रूट 08/5(6.2), जॅक लीच 54/4(20), जोफ्रा आर्चर 24/1(5.0)
भारतीय फिरकीपुढे पहिल्या डावात इंग्लंडचे लोटांगण….
#ENG | इंग्लंडचा पहिला डाव 112 वर आटोपला
– अक्षर पटेलचे 6 बळी
-आर आश्विनचे 3 तर इशांतचा 1 बळी
-जॅक क्राउलीची अर्धशतकी खेळी
– इंग्लंडचे डाॅम सिबली आणि जाॅनी बेयरस्टो शूऩ्यावर बाद
ENG (पहिला डाव) : 112/10(48.4)
 
इंग्लंड फलंदाजी : जॅक क्राउली 53(84), डाॅम सिबली 0(7), जाॅनी बेयरस्टो 0(9), जो रूट 17(37), बेन स्टोक्स 6(24), आॅली पोप 1(12), बेन फोक्स 12(58), जोफ्रा आर्चर 11(18), जॅक लीच 3(14), स्टुअर्ट ब्राॅड 3(29), जेम्स अॅडरसन 0*(3)
भारतीय गोलंदाजी (पहिला डाव) – अक्षर पटेल 38/6(21.4), इशांत शर्मा 26/1(5.0), रविचंद्रन अश्विन 26/3(16.0), जसप्रीत बुमराह 19/0(6.0).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.