६४ पोलीस उपनिरीक्षकांकडून गडचिरोलीत बदलीसाठी अर्ज

गडचिरोली : नक्षलवादग्रस्त गडचिरोलीत बदली म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा असा एक समज आहे. हा समज खोटा ठरवत मुंबईच्या ६४ पोलीस उपनिरीक्षकांनी गडचिरोली येथे काम करण्याची इच्छा दर्शवत विनंती बदलीसाठी अर्ज केला होता.

आदिवासी भागात काम करून समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेसोबतच नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाची भावनाही व्यक्त केली. या सर्व ६४ पोलीस उपनिरीक्षकांचे बदलीसाठीचे विनंती अर्ज २३ मे २०१८ रोजीच्या बैठकीत ठेवण्यात आले, परंतु हे अर्ज अमान्य करण्याचा निर्णय घेतला गेला. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा या सर्व ६४ पोलीस उपनिरीक्षकांना मुंबई येथेच कर्तव्यावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)