मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेली गळती थांबताना दिसत नाही आहे. आज राष्ट्रवादी मधील दिग्गज कालीदास कोळंबकर आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिला. काहीदिवसांपूर्वी शरद पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले माझ्याकडे दीड तास बसले होते, ‘मी पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही’ असं त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले होते. मात्र आज आमदारकीचा राजीनामा देऊन शिवेंद्रसिंहराजेंनी सर्वाना धक्का दिला.
कालीदास कोळंबकर आणि शिवेंद्रराजे भोसले हे उद्या भाजपमध्ये चर्चा करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत मधुकरराव पिचड आणि कोळंबकरांनी आपला राजीनामा दिला. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडेंकडे राजीनामा दिला.
दरम्यान, गिरीश महाजन म्हणाले राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील ४ आमदार नाहीत तर चक्क ५० आमदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकारणात आणि वादळ निर्माण होणार हे मात्र नक्की आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घराणेशाही व अंतर्गत गटबाजीला त्यांचे नेते कंटाळले असल्याची टीका देखील महाजन यांनी केली आहे.