१२ वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी?

नवी दिल्ली: बारा वर्षांखालील मुलींचा बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात आरोपी सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी लोकसभेमध्ये आज एक महत्वपूर्ण विधेयक मांडण्यात आले. काश्मीर येथील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकारणांनंतर देशभरामध्ये बलात्कार विरोधी कायदे कडक करण्यासाठी आंदोलने छेडण्यात आल्याने केंद्र सरकारवर चांगलाच दबाव आला होता. याच पार्श्ववभूमीवर आता केंद्र सरकारने अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांविरोधातील कायदे कडक करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे.
फौजदारी गुन्हे कायदा दुरुस्ती विधायक २०१८चे सर्वपक्षीय सदस्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. या विधेयकानुसार १२ वर्षांखालील मुलीचा बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. तर महिलांचा बलात्कार करणाऱ्यांसाठी पूर्वी असलेली ७ वर्षांची शिक्षा १० वर्षांची करण्यात आली आहे. १२ ते १६ वर्षांच्या मुलींचा बलात्कार करणाऱ्यास यापूर्वी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होती ती आता वाढवून २० वर्षे किंवा जन्मठेप अशी करण्यात आली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)