हॉकर्स संघटना करणार जेलभरो आंदोलन

सातारा- न्यायालयाने आदेश देवून देखील पालिकांकडून हॉकर्सचे सर्व्हेक्षण व पुर्नवसन होत नसल्याने हॉकर्स संघटनेने जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्यावतीने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, सागर भोगावकर, संजय पवार आदी उपस्थित होते.

केंद्रिय पथविक्रेता संरक्षण व उपजिविका अधिनियम व त्यापुर्वीचे राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 नुसार सातारा जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये हॉकर्सना न्याय, हक्क व संरक्षण मिळावे यासाठी संघटनेने सातत्याने निवेदने, चर्चा व आंदोलने देखील केली. मात्र, हॉकर्ससाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी हॉकर्सना हुसकावून व विस्थापित करून त्यांच्यावर जाणीवपुर्वक अन्याय केला जात आहे. तसेच 1 नोव्हेंबर 2017 रोजी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या आदेशानुसार दि.1 मे 2014 रोजी अस्तित्वात असलेल्या व त्यानंतरच्या हॉकर्सचे सर्व्हेक्षण पालिकेने करायचे होते. मात्र, ते अद्याप करण्यात आले नाही. पालिका प्रशासन न्यायालयाच्या आदेशाला एकप्रकारे केराची टोपली दाखवित असल्याने अखेर जेलभरो आंदोलन करण्याची भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)