‘हॉकर्स झोन’चा प्रश्‍न मार्गी लावा!

फेरीवाला महासंघाचे आवाहन : खासदार, आमदारांनी एकत्र यावे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड मधील अतिक्रमणांवरून शहरातील फेरीवाले धास्तावले आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने फेरीवाल्यांविरुद्धच्या कारवाईसाठी आरोप, प्रत्यारोप करणाऱ्या खासदार, आमदारांनी “हॉकर्स झोन’साठी एकत्र यावे, अशी मागणी फेरीवाला महासंघाकडून करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिक्रमणे व हातगाडी, टपरीधारकांमुळे शहरातील वाहतूक कोंडी यावरून खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. त्यात रस्त्यावर उपजीविका करणारा हातगाडी, टपरीधारक भरडला जाणार आहे.

त्यामुळे या गरीब व गरजू लोकांसाठी बारणे, जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील या राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शहरातील लोकप्रतिनिधींनी फेरीवाल्यांचे भले करण्यासाठी एकत्र येऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला “हॉकर्स झोन’चा प्रश्न मार्गी लावून कष्टकरी वर्गाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन फेरीवाल्यांचे नेते व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

जाहिरनाम्यातील वल्गनांचे काय?
पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेरीवाला कायदा व धोरण स्वीकारले आहे. मात्र, त्याचा अंमल करण्याबाबत पालिका प्रशासन चालढकल करीत आहे. त्यांचे निष्क्रिय अधिकारी आणि बेजबाबदार सत्ताधारी यामुळे आधी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आता भाजपाच्या सत्ताकाळात हॉकर्स झोनचा प्रश्न लटकलेला आहे. अच्छे दिनचे ते स्वप्नच आता वाटू लागले आहे. राजकीय पक्ष हे कामगार कष्टकरी, फेरीवाला, यांचा केवळ निवडणुकीपुरता विचार करीत आहेत. त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात सुनियोजित भाजी मंडई, “हॉकर्स झोन’च्या वल्गना केल्या आहेत. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)