हॉंगकॉंग आणि अमेरिकेच्या विमान कंपन्यांवर चीनचा दबाव

तैवान चीनचा भाग असल्याचे केले मान्य

हॉंगकॉंग – तैवानचा संदर्भ चीनचा भाग म्हणूनच करावा यासाठी हॉंगकॉंग आणि अमेरिकेच्या विमान कंपन्यांवर चीनने टाकलेला दबाव आज निर्णायक ठरला. चीनच्या दबावापुढे झुकून हॉंगकॉंगच्या कॅथे पॅसेफिक आणि अमेरिकेतील प्रमुख विमान कंपन्यांनी तैवानचा उल्लेख चीनचा भाग असा करायला सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र या प्रकारावर तैवानने जोरदार आगपाखड केली आहे. तैवान हा स्वायत्त भूप्रदेश आहे. चीनची ही कृती उद्धट आहे. चीनकडून आपल्या राजकीय आणि आर्थिक ताकदीचा वापर आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर केला जात असल्याची टीका तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये तैवानचे अस्तित्व हे विशेष उद्दिष्ट असलेले आहे.

तैवानचे अस्तित्व हे चीनी प्रशासनाच्या दबावतंत्रामुळे संपून जाणार नाही, असे तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
तैवान हा स्वयंशासित लोकशाहीवादी देश आहे. मात्र चीनकडून तैवानला आपलाच भूभाग मानले जात आहे. तैवानचे चीनमधील सामिलीकरण घडवून आणण्यासाठी चीनकडून प्रसंगी बळाचा वापरही केला जाऊ शकतो. त्यासाठी आंतराअष्ट्रीय व्यासपीठावर तैवानला एकटे पाडण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत.

जगभरातील सुमारे डझनभर विमान कंपन्यांना चीनच्या विमान वाहतुक प्रशासनाने एप्रिल महिन्यात बिजींगच्या धोरणाला अनुसरून नोटीसा पाठवल्या होत्या. तैवानबाबतचे उल्लेख बुधवारपर्यंत बदलून घेण्याची मुदतही देण्यात आली होती. त्यानुसार कॅथे पॅसिफिक आणि त्याच्या सहयोगी कंपनी कॅथे ड्रॅगन यांनी तैवानचा स्वतंत्र उल्लेख टाळून चीनचा भाग असा उल्लेख करायला सुरुवात केली. त्याच प्रमाणे अमेरिकन एअरलाईन्स, युनायटेड एअरलाईन्स , डेल्टा आणि हवाइवान एअरलाईन्सनेही तैवानच्या नामोल्लेखात बदल करण्याची तयारी दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)