हैद्राबाद बलात्कार प्रकरण : पीडितेला जाळण्यासाठी पेट्रोल खरेदीचे नराधमांचे सीसीटीव्ही फूटेज समोर

हैद्राबाद : हैद्राबादमधील महिला डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी पीडितेला जाळण्यासाठी पेट्रोल खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. याच व्हिडीओच्या आधारे चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

प्रकरणाचा तपास करत असताना पेट्रोल पंपावरून पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज मिळाले होते. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पीडितेच्या मृतदेहाला जाळण्यासाठी आरोपी पेट्रोल खरेदी करत असलेले दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारेच आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपीची ओळख सांगितली होती.

पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जोलू शिवा हा घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी केले. मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपी दोन लीटरची रिकामी बाटली घेऊन पंपावर पोहचला होता. त्याला कर्मचाऱ्याने पेट्रोल देण्यासही नकार दिला होता. त्यानंतर आरोपींनी दुसऱ्या पंपावरून पेट्रोल खरेदी केले. याच व्हिडीओच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहचले होते.

दरम्यान, सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिला पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी तिचे हातपाय बांधले. तसेच त्या महिलेला जबरदस्ती दारूही प्यायला लावली. त्यानंतर ती महिला बेशुद्ध पडताच तिला पुलाखाली नेण्यात आले आणि तिथ तिच्या अंगावर पेट्रोल टाकून त्या महिलेला जाळण्यात आले,’ असे खुलासे आरोपीने पोलीस कोठडीत केल्याचे हैदराबादमधील स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.