हैदराबादमधील दिशा प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायलयात

हैदराबाद : येथे महिला पशुचिकित्सकावर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायलयात घेण्यास तेलंगणा उच्च न्यायलयाने मान्यता दिली आहे. याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला होता.

विधी सचिवांनी यायबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला उच्च न्यायलयाने परवानगी दिल्याने याबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सरकार बुधवारी उशीरा आदेश काढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. दोषींना कठोर शिक्षा तात्काळ होण्यासाठी न्यायलयाची उभारणी अत्यंत वेगाने करण्याचे आदेश मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राच यांनी दिले.

दिशासोबत 27 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेने देश ढवळून निघाला आहे. यात अनेक धक्कादायक बाबी तपासात पुढे येत आहेत. या प्रकारानंतर तेलंगणा आणि देशभरात आंदोलनाचा उद्रेक होत आहे. दोषींना शिक्षा देऊन पिडितेला न्याय द्यावा यासाठी समाज माध्यमांत मोहीम राबवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.