हे फक्‍त घोषणाबाज सरकार

सांगवी येथे किरण तावरे यांची टीका

डोर्लेवाडी- ग्रामीण भागाच्या विकासकामांसाठी भाजप-सेना सरकारचे दुर्लक्ष होत असून हे सरकार फक्त घोषणाबाज आहे. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार याबाबतीत सरकार उदासीन आहे. बुलेट ट्रेन आणू पाहणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत. सरकार आल्यावर 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशी फसवी घोषणा करून सरकारने जनतेची फसवणूक केली आहे,अशी खरमरीत टीका किरण तावरे यांनी केंद्र व राज्यसरकारवर केली आहे.
सांगवी (ता. बारामती) येथे पुणे जिल्हा परिषदेमार्फत पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामासाठी 35 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचे भूमिपूजन संभाजी होळकर यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी तावरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, सरपंच हेमलता तावरे, दूध संघाचे संचालक प्रकाश तावरे, संजय देवकाते, बाळासाहेब वाबळे, बाबुराव चव्हाण, रणजीत धुमाळ, चंदन पोदकुले, गणेश खलाटे, निशिकांत निकम, बाळासाहेब तावरे, सुहास पोदकुले, स्वाती तावरे , शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाश तावरे म्हणाले की, सांगवी गावाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकासकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तर सहा महिन्यांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगवीत सत्कार समारंभात आले असता सांगवी गावाच्या विकास कामाकरिता 51 लाख देतो असे म्हणाले होते मात्र, त्यांनी दिलेला शब्द हा फुसका बार निघाला असल्याचा चिमटा त्यांनी काढला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)