हेल्प रायडर्स घेणार पूरग्रस्तगाव दत्तक

शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य देणार

पुणे  : वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग करूदेतानाच रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेत स्थापन केलेल्या  ” हेल्प रायडर्स’ कडून सांगली जिह्यातील पुणदी हे गाव विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दत्तक घेतले जाणार आहे. या गावातील सर्व विद्यार्थ्यांना हेल्प रायडर्स कडून आवश्‍यक असलेले सर्व शैक्षणिक साहित्य तातडीनं उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सांगली जिल्हयात पूरग्रस्त भिलवडी, पुणदी, अंकलकोप, आमनापूर यासह सहा गावांमध्ये सुसज्ज रुग्णवाहिकेसह वैद्यकीय सेवा राबवून एक हजार एकशे सत्तर पूरग्रस्तांना औषधोपचार केले, तसेच पुनर्वसन केंद्रात जीवनावश्‍यक वस्तूंची मदत करून दोन दिवस पूरग्रस्त भागात मदत कार्य केले. त्यात, पाण्याचा वेढा असणाऱ्या ;पण घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या पुरग्रस्तांपर्यंत अन्नधान्य तसेच जिवनावश्‍यक वस्तू पोहचविल्या. पूरग्रस्तांना मोठ्याप्रमाणावर येणाऱ्या मदतीमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही हेल्प रायडर्सच्या सदस्यांनी अनेक ठिकाणी कार्य केले.                         हेल्प रायडर्सचे मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया,अजित जाधव, सचिन पवार , श्रीकांत कापसे, अनुपम शहा,प्रशांत महानवर ,बाळासाहेब अहिवळे, संतोष पोळ, बाळासाहेब ढमाले , सुदिन जायाप्पा, बाळा जगताप ,विशाल धुमाळ ,विनायक मुरुडकर, प्रसाद गोखले, महेश चिले, प्रवीण पगारे ,संतोष वरे, संदीप करपे, महेंद्र जाधव यांच्यासह औरंगाबादचे संदीप कुलकर्णी ,अक्षय बाहेती आणि सदस्यांनी सहभाग घेतला. डॉ. रोहित बोरकर, डॉ. निखिल शेंडकर, डॉ. पूजा कणके व पथकांनी पुरग्रस्तांवर प्राथमिक उपचार केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)