हेडली तुरुंगातही नाही, हॉस्पिटलमध्येही नाही

वकिलाचा दावा

वॉशिंग्टन – पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली हा शिकागोमधील तुरुंगात किंवा हॉस्पिटलमध्येही नसल्याचा दावा हेडलीच्या वकिलांनी केला आहे. मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 35 वर्षांची शिक्षा झालेल्या हेडलीवर तुरुंगात अन्य दोन कैद्यांकडून प्राणघातक हल्ला झाल्याने गंभीर जखमी झाला असल्याचा दावाही त्यांनी फेटाळला आहे. हेडलीचा ठावठिकाणा आपण जाहीर करू शकत नाही. मात्र तो शिकागोमध्ये किंवा हॉस्पिटलमध्येही नाही, असे हेडलीचे वकिल जॉन थेइस यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. हेडलीवर हल्ला झाल्याच्या वृत्तावर अमेरिकेतल्या प्रशासनाने सोमवारी कोणतेही वक्‍तव्य करण्यास नकार दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हेडलीवर शिकागोतील तुरुंगात 8 जुलै रोजी दोन कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या हेडलीला इव्हान्स्टोन हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्यावर थेइस यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे. आपण नियमितपणे हेडलीच्या संपर्कात आहोत. भारतामधील प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या तुरुंगातील हल्ल्याच्या बातम्या निराधार आहेत, असेही थेइस यांनी सांगितले.

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने हेडलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या 6 नागरिकांसह एकूण 160 जण मृत्यूमुखी पडले होते. “26/11’च्या हल्ल्याआगोदर हेडलीने मुबईत येऊन विविध ठिकाणांची पहाणी केली होती. पाकिस्तानातील दहशतवाद प्रशिक्षण केंद्रांमध्ये 2002 आणि 2003 मध्ये उपस्थित राहणे आणि हल्ल्याच्या कटासाठी “लष्कर ए तोयबा’च्या संगनमताने काम केल्याच्या आरोपात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)