हृदयप्रत्यारोपण केवळ श्रीमंतांसाठीच..!

जागतिक हृदय दिन: ससूनला अद्यापही परवागीची प्रतीक्षा

पुणे – दिवसागणिक सर्व आरोग्य सुविधा आपल्याला उपलब्ध झाल्या असून विज्ञान किती पुढे गेले, याचे दाखले आपल्याला रोज दिले जातात. परंतु हे विज्ञान आणि तंत्रज्ञान केवळ एका वर्गासाठीच उपलब्ध झाले आहे का, असा प्रश्‍न निर्माण होते. हृदय प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया काही वर्षापूर्वीच अस्तित्त्वात आली आहे. तरीही अद्याप ससूनसारख्या मोठ्या सरकारी रुग्णालयाला मात्र याची प्रतीक्षाच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजमितिला मुंबईसारख्या शहरात जवळपास दिवसाला एक हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जात आहे. पुण्यातही हे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र याचा खर्च अनेकांना परवडणारा नाही. यासाठी किडनी, यकृताप्रमाणे आता सरकारी रुग्णालयात याही शस्त्रक्रिया होण्याची आवश्‍यकता आहे. ससून रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपणासाठी आतापर्यंत दोनवेळा शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. हृदयशस्त्रक्रियेसाठी लागणारी सर्व सुसज्ज यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम ससूमध्ये उपलब्ध आहे. मात्र, जवळपास एक वर्षाहून अधिक कालावधीपासून परवानगी मिळवण्यासाठी ससून रुग्णालय प्रयत्नशील असून सकराकडून यासाठी परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अद्यापही अनेक सामान्यांपासून हे विज्ञान तंत्रज्ञान दूरच असल्याचे स्पष्ट होत आहे.

याबाबत एक वर्षापुर्वीच आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतही फेरप्रस्ताव पाठविला आहे. याबाबत शासनाकडून तपासणी देखील झाली आहे, मात्र अद्याप आम्ही परवानगीच्या प्रतिक्षेत आहोत. आपल्याकडे आवश्‍यक ती सर्व यंत्रणा उपलब्ध आहे.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

अद्यापही 18 रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत
पुणे झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटरच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 पासून आतापर्यंत पुण्यात 16 हृदयप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच 16 हृदय पुण्यातील रुग्णांकडून मुंबईला पुरविण्यात आले आहेत. मुंबईमधून आपल्याला एक हृदय प्राप्त झाले होते. तसेच 2 हृदय हे पुण्यातून चेन्नईला व 2 दिल्लीलाही पाठविण्यात आले होते. तर सध्या अजुनही 18 रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत आहेत. दरम्यान, मुंबई सेंटरच्या माहितीनुसार, मुंबईतमध्ये दि. 31 मार्चपर्यंत 86 हृदय प्रत्यारोणाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)