हृतिक रोशनविरोधात एफआयआर दाखल

हृतिकवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आर. मुरलीधर नावाच्या एका किरकोळ व्यापाऱ्याने हृतिक आणि अन्य 8 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण खूप गंभीर असेल, असे वाचकांना वाटू शकेल. कदाचित हृतिक फसवणूक कशी काय करू शकेल, अशी शंकेची पालही मनात चुकचुकत असेल, पण तसे नाही. या फसवणुकीच्या आरोपामध्ये हृतिकचा प्रत्यक्ष सहभाग काही नाही.

हृतिकने 2014 मध्ये आपला स्वतःचा क्‍लोदिंग ब्रॅन्ड “एचआरएक्‍स’ या नावाने सुरू केला आहे. हृतिकच्या या ब्रॅन्डच्या मर्चेंडाईझसाठी या आर. मुरलीधरला गुडगावात स्टॉकिस्ट म्हणून नियुक्‍त केले होते. हृतिक आणि अन्य 8 जणांनी केलेल्या फसवणुकीमुळे आपल्याला 21 लाख रुपयांचे नुकसान झाले, असे या मुरलीधर नावाच्या माणसाने पोलिसांकडे दाखल केलेल्या “एफआयआर’मध्ये म्हटले आहे. “एचआरएक्‍स’ फर्मकडून आपल्याला कपडे नियमितपणे मिळत नव्हते, असे या व्यापाऱ्याने म्हटले आहे. हृतिकने आपल्या मार्केटिंग टीमला न सांगताच मार्केटिंग थांबवले. त्यामुळे मुरलीधरकडील कपड्यांचा माल तसाच पडून राहिला. कामगारांचे पगार आणि गोदामाचे भाडे मिळून एकूण 21 लाखांचे नुकसान या व्यापाऱ्याला सोसावे लागले. मुरलीधरच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हृतिक आणि अन्य 8 जणांविरोधात “एफआयआर’ दाखल केली आहे. यापूर्वी कंगणा रणावतनेही तिचा ई मेल हॅक केल्याच्या आरोपाखाली हृतिकला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या हृतिक विकास बहलच्या “सुपर 30’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पुढील वर्षी 25 जानेवारीला रिलीज होणारा हा सिनेमा बिहारमधील गणिततज्ज्ञ अभय आनंद यांच्या जीवनावर आधारित आहे. गंमत अशी की ज्या कंगणा रणावतबरोबर हृतिकचे जुने भांडण आहे, त्या कंगणाचा “मणिकर्णिका’ही याच दरम्यान रिलीज होतो आहे. त्यामुळे या दोघांची बॉक्‍स ऑफिसवर टक्कर होणार हे निश्‍चित आहे. याशिवाय इमरान हाश्‍मीचा “चीट इंडिया’ देखील याच वेळी रिलीज होतो आहे. तोपर्यंत या फसवणुकीच्या प्रकरणाचा काही तरी निकाल लागलेला असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)