“हुमणी’गस्त उभा ऊस तोडला शेतकऱ्याने

कोपरगाव – ऊस शेतीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोपरगाव तालुक्‍यात हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वैतागले आहे. या अळीमुळे हिरव्या गार ऊसाचे पाचट झाल्याने आता शेतकऱ्यांनी उभा ऊस तोडण्यास सुरूवात केली आहे.
पावसाने मारलेली दडी, बोंडअळीचे पंचनामे होऊनही अद्यापपर्यत न मिळालेली नुकसान भरपाई विहिरींनी गाठलेला तळ, उत्पादित मालाला नसलेला बाजारभाव, यामुळे आधीच शेतकरी बेजार झाला असतांना त्यात आता उभ्या हिरव्या गार ऊस पिकावर हुमणी अळींचा झालेल्या प्रादुर्भावाने संपूर्ण ऊसाचे पिक उध्वस्त झाले आहे. त्यावर झालेला खर्च व काढलेले पिक कर्जही भरण्याची शेतकऱ्यामध्ये हिंमत न राहिल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला असल्याने तो हवालदिल झाला.
हुमणी ही अळी ऊसाच्या मुळावरच येऊन पिकाची मुळे खात असल्याने पिकाला अन्नरस मिळणे बंद झाल्याने ऊस वाळुन जात आहे. कोपरगाव तालुक्‍याच्या उत्तरेस असलेल्या अंचलगाव शिवारातील सर्व्हे नंबर 42 मधील ऊसाचे संपूर्ण क्षेत्र या हुमणी अळीने नष्ट झाल्याने या शेतकऱ्याने हा ऊस नाईलाजाने तोडण्यास सुरुवात केली आहे. कपाशीवरील बोंडअळीच्या धर्तीवर ऊसावरील हुमणी अळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली असुन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी अशा हुमणी अळींच्या प्रादुर्भाव झालेल्या ऊस पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास द्यावे असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)