हुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच!

राजगुरूनगर, दि.29 (प्रतिनिधी) – पुणे-नाशिक महामार्गावरील एसटी बस स्थानकाजवळ असलेला थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांचा पुतळा मागे घेण्यात येणार असून तेथे हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे पुतळे बसविण्यात येणार आहे. हे काम गेली सहा महिन्यांपासून सुरु करण्यात आले आहे. मात्र काम करत असताना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या नागरिकांनी केलेल्या अनेक तक्रारीत तथ्य असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे यांनी मान्य केले आहे.
राजगुरुनगर येथे एसटी बसस्थानकात बांधण्यात येणारे हुतात्मा राजगुरू स्मारकाच्या कामाची पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आदेशाने जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे यांनी आज (गुरुवारी) पाहणी असून त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली तसेच याबाबतचा अहवाल पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धनराज दराडे, खेड बाजार समितीचे माजी सभापती शांताराम चव्हाण, शिवसेनेचे दिलीप तापकीर आदी उपस्थित होते. यावेळी बांधकामात काय सुधारणा पाहिजेत, कोठे कोठे कामात निकृष्टपणा होता त्या ठिकाणची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धनराज दराडे यांनी या कामाची मेदगे यांना माहिती दिली.
दरम्यान, नागरिक व हुतात्मा राजगुरूप्रेमींची मागणी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी मान्य करीत पुतळा मागे घेण्यासाठी एसटी महामंडळाची जागा यासाठी उपलब्ध करून घेत हुतात्मा राजगुरू पुतळा स्थलांतर व सुशोभीकरण कामासाठी सुरुवातील 25 लाखांचा निधी उपलब्ध करून काम सुरू करण्यात आले. या कामासाठी नव्याने 25 लाख रुपयांचा निधी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिला आहे. अजूनही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन खासदार, आमदार यांनी दिले. तर पालकमंत्री या कामासाठी निधी देणार होते. मात्र, खासदार आढळराव पाटील यांनी अगोदर निधी दिला आहे. मात्र, येथील सामाराकाच्या कामाच्या दर्जाबाबत व होत असलेल्या निकृष्ट कामाबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या त्याची दखल घेत बापट यांनी मेदगे यांना पाहणी करून आवाहल देण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार मेदगे यांनी त्याची पाहणी केली असून त्याचा अहवाल ते पालकमंत्र्यांना देणार आहेत.

  • नागरिकांच्या सूचना लक्षात घेत ज्या-ज्या ठिकाणी काम निकृष्ट झाले त्याची पाहणी केली आहे. नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर समोर आले आहे. याबाबत आम्ही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून याबाबतचा पाहणी अहवाल पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
    – दिलीप मेदगे, सदस्य जिल्हा नियोजन समिती
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)