हिसेंची आंदोलने फारकाळ टिकत नाहीत

राजू शेट्टी : सनदशीर मार्गानेच आंदोलने झाली पाहिजेत

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.31 – मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रशासनातील लालफितीचा कारभार जबाबदार असल्याचे मत स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. त्याचबरोबर हिसेंची आंदोलने फारकाळ टिकत नाहीत. त्यामुळे सनदशीर मार्गानेच आंदोलने झाली पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने शेट्टी यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, या समाजाला आरक्षण मिळणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या समाजाने थोड संयम पाळणे गरजेचे आहे. इतके दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना शेवटच्या टप्यात हिंसक आंदोलन करून प्रतिमा मलीन करू नये.
मराठा आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शासनाने देखील सुरवातीपासून या मागणीकडे गंभीरपणे पाहण्याची गरज होती. लालफितीच्या कारभारामुळे त्याला दिरंगाई होत आहे. त्यामुळेच संघर्ष वाढत आहे. त्याचबरोबर मराठा समाजामध्ये विश्‍वास निर्माण करण्यात सरकार कुठेतरी कमी पडले असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना बुधवारपासून (दि.1 ऑगस्ट) 25 रुपये दर देण्याचे निश्‍चित झाले आहे. प्रत्येक खासगी व सहकारी दूध संघांनी हा दर दिला पाहिजे. या संदर्भात आम्ही आढावा घेत आहोत. सध्या सर्वच संघांनी शासनाने जाहीर केलेला दर देण्याची तयारी दर्शविली आहे. पुढे काय होते ते पाहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापुढे भाजपबरोबर जाणार नाही
सहा लोकसभा मतदार संघातून आम्ही यंदा आपले उमेदवार उभे करणार आहोत. सध्या तरी कुठल्याच पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही. आगामी काळात आघाडी करण्याबाबत विचार होऊ शकतो; पण भाजपबरोबर यापुढे कधीच जाणार नाही हे निश्‍चित आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)