हिमाचल प्रदेशात पूरात अडकलेल्या 300 जणांची सुटका

सिमला – मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात लाहौल आणि स्पिती जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्या सुमारे 300 जणांची सुटका करण्यात आली. हिमाचल प्रदेशातील 600 रस्त्यांपैकी बहुतेक रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद झाले होते. ते पुन्हा सुरू करण्यात आले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुर्गम ठिकाणी अडकून पडलेल्या 27 जणांना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सोडवण्यात आले. यामध्ये 9 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. तर “बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन’ने अनेक नागरिकांची सुटका केली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. हिमाच प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांइतल्यानुसार 600 रस्त्यांपैकी चंदिगड मनाली रस्त्यासह बहुतेक रस्त्यांवरील वाहतुक पुन्हा सुरू झाली आहे. लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या 300 जणांची सुटकाही केली. सुमारे 200 जण अजूनही काही ठिकाणी अडकून पडले आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्‍चिम बंगालमधील रहिवासी असलेल्या 8 जणांना हवाई मार्गाने लाहौल जिल्ह्यातील स्तिंग्री येथे आणि कुलू जिल्ह्यातील भुंतर येथे हलवण्यात आले असे केयलोग उपविभागीय दंडाधिकारी आमर नेगी यांनी संगितले. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी सक्रिय आहेत, असेही नेगी यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशातील वातावरण आता अनुकूल बनले आहे, त्यामुळे हवाई दल आणि “बीआरओ’कडून रस्त्यांची दुरुस्तीचे काम आणि अडकलेल्या नागरिकांची मदत सुकर होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)