हिमाचलच्या माजी राज्यपाल उर्मिला सिंह यांचे निधन

इंदूूर – हिमाचल प्रदेशच्या माजी राज्यपाल आणि कॉंग्रेस नेत्या उर्मिला सिंह यांचे आज मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
आजारपणामुळे उर्मिला यांना 6 जानेवारीला इंदूूरमधील बॉम्बे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे त्यांना बऱ्याच दिवसांपासून जीवरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.

रूग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. कॉंग्रेसच्या माध्यमातून उर्मिला यांनी प्रदीर्घ काळ राजकीय कार्य केले. त्यांनी काही काळ मध्यप्रदेशच्या मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (एनसीटीसी) अध्यक्षा म्हणूनही त्यांनी कार्य केले. त्यांची 2010 मध्य हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्यप्रदेशातील कॉंग्रेस आमदार योगेंद्र सिंह हे त्यांचे पुत्र आहेत. दरम्यान, उर्मिला यांच्या निधनाबद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कमल नाथ आणि इतर नेत्यांनी दु:ख व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)