हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी समीर टायगरला लष्कराकडून कंठस्नान

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात लष्कराने केलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेला सोमवारी मोठे यश मिळाले आहे. सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगर याला कंठस्नान घातल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे समीर टायगर हा खोऱ्यामध्ये बुऱ्हाण वाणीप्रमाणेच दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय मानला जात होता.

द्राबगाम येथे सोमवारी सकाळपासूनच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. या चकमकीमध्येच लष्कराने समीर टायगरला कंठस्नान घातले. समीरबरोबरच अकीब खान नामक अन्य दहशतवाद्यालाही लष्कराने ठार केले. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी आल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराने शोधमोहीम राबवून ही कारवाई केली. लष्कराने परिसराला घेराव घातल्यावर काही स्थानिकांकडून लष्करावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)