हिज्बुल प्रमुख सलाहुद्दीनच्या दुसऱ्या मुलालाही अटक

श्रीनगर – हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सैद सलाहुद्दीन याच्या दुसऱ्या मुलालाही अटक करण्यात आली आहे. सैद शकील युसूफ असे त्याचे नाव आहे.

दहशतवादासाठी पैसा गोळा करण्याशी संबंधित प्रकरणात शकीलला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने श्रीनगरमध्ये अटक केली. त्या प्रकरणात एनआयएने याआधीच सलाहुद्दीनचा आणखी एक मुलगा शाहीद याला अटक केली. जूनमध्ये ती कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकरण पाकिस्तानमधूून हवालामार्फत दिल्लीमार्गे जम्मू-काश्‍मीरात पैसे पाठवण्यात आल्याशी निगडीत आहे. तो पैसा दहशतवादी आणि विभाजनवादी कारवायांसाठी वापरल्याचा संशय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणात दोन मुलांना झालेली अटक हा सलाहुद्दीनसाठी जबर झटका मानला जात आहे. सलाहुद्दीन हा काश्‍मीर खोऱ्यात सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या युनायटेड जिहाद कौन्सिलचाही (यूजेसी) प्रमुख आहे. त्याला अमेरिकेने याआधीच जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. सलाहुद्दीनसह दहा जणांविरोधात एनआयएने 2011 मध्ये दहशतवादासाठी पैसा गोळा केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)