हिंद सेवा मंडळाविरोधातील सर्व याचिका मागे

मंडळाच्या वतीने याचिकाकर्ते शरद गोखले यांचा सत्कार
नगर – हिंद सेवा मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या घटने संदर्भात नगर धर्मदाय आयुक्त यांच्याकडे हरकती घेऊन न्यायालयात याचिका दाखल करणारे मंडळाचे ज्येष्ठ सभासद शरद गोखले यांनी नुकतेच मंडळा विरोधातील सर्व दावे व याचिका मागे घेतल्या आहेत. 2011 पासून या याचिकांवर सुनावणी चालू असून, सर्व याचिका अजूनही न्यायप्रविष्ठ होत्या. या सर्व याचिका मागे घेतल्याने मंडळाचा कारभार अधिक वेगाने होणार आहे, याबद्दल हिंद सेवा मंडळाच्यावतीने याचिकाकर्ते शरद गोखले यांचा सत्कार करुन आभार मानण्यात आले. यावेळी सचिव सुनिल रामदासी, संचालक ऍड.अनंत फडणीस, अजित बोरा, डॉ.पारस कोठारी, मधुसूदन सारडा, मकरंद खेर, सुमतीलाल कोठारी, संजय जोशी, बी.यु.कुलकर्णी, व्यवस्थापिका सुवर्णा देव व कैलास बालटे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रा.शरद गोखले म्हणाले, हिंद सेवा मंडळाकडे मराठी घटनेची मंजूर प्रत नसल्याने याबाबतचा दावा करुन मंडळावर प्रशासक नेमण्यात यावा, अशी याचिका 2011 साली केली होती. मात्र मंडळाचा अत्यंत व्यवस्थीत चालू असल्याने कारभाराबाबत कोणतीही तक्रार नसून, मंडळाच्या सर्व शैक्षणिक संस्था प्रगतीपथावर नेणारा आहे. त्यामुळे धर्मदाय आयुक्त कार्यालयात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली ही याचिका मागे घेत आहे. न्यायालयीन प्रक्रियेत मंडळाचा मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा वाया जात असल्याचे लक्षात आल्याने हा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये विविध सुविधांसाठी मदत म्हणून 25 हजार रुपये रोख देत आहे.
याप्रसंगी बोलतांना मंडळाचे अध्यक्ष प्रा.मोडक यांनी यावेळी शरद गोखले यांचे आभार मानून भविष्यात मंडळाच्या कारभारात सक्रिय सहभाग घेऊन मार्गदर्शन करावे. मंडळाच्या शैक्षणिक संस्थां
मध्ये सुविधा मिळाव्यात यासाठी दिलेल्या निधीबद्दलही मंडळ गोखले यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात सचिव सुनिल रामदासी म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या विरोधातील सर्व याचिका ज्येष्ठ सभासद शरद गोखले यांनी मागे घेतल्याने मंडळाचा कारभार पारदर्शी असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. शरद गोखले यांच्या या निर्णयाचे स्वागत मंडळ करत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित बोरा यांनी केले तर आभार डॉ.पारस कोठारी यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)