हिंजवडीत मराठा मोर्चाचा तीन तास ठिय्या

पिंपरी – राज्यभरात सकल मराठा मोर्चाचे पडसाद उमटत असताना हिंजवडीत आंदोलकांनी सोमवारी (दि. 30) तब्बल तीन तास ठिय्या मांडल्याने आयटीनगरीची कोंडी झाली होती. हिंजवडीतील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आंदोलनाचे समर्थन केले.

हिंजवडी मधील शिवाजी चौकातून सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. परिसरातील शेकडो तरुण मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा सकल मोर्चाकडून आज हिंजवडी बंदची हाक देण्यात आली होती. हिंजवडी आयटीनगरी जगभरात नावाजलेली आहे, जगातील नामांकित कंपन्यांची कार्यालये या ठिकाणी आहेत, लाखो आयटीयन्सची या ठिकाणी वर्दळ असते या सगळ्या पार्श्वभूमीवर हिंजवडी पोलिसांनी रात्रीपासूनच चोख बंदोबस्त ठेवला होता.

सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अर्पण केली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच राहील, सरकारने आंदोलन हिंसक बनत चालले आहे, मराठा समाजाचा संयम सुटत चांगला आहे याची गांभिर्याने दखल घ्यावी, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे हिंजवडी ठप्प झाली होती. शेकडो आयटीएन्स रस्त्यात अडकून पडले. अखेर बाराच्या सुमारास ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)