हाेमिओपॅथी आणखी सुरक्षित 

डॉ. राजीव कोटगीरे 
होमिओपॅथी डॉक्‍टर्स आणि प्रदात्यांनी आता पारंपरिक औषधाच्या स्वरूपाला प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित डिस्पेंसिंग पद्धतींचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या ऍलोपॅथिक औषधे आणि कधी कधी स्टेरॉइडच्या मोठ्या मात्रा असलेल्या सुट्या औषधांच्या अहवालांचे अनुसरण करत नवीन पध्दती अंगीकारण्यात आल्या आहेत. 
प्रथमच डॉक्‍टरांनी रुग्णांना नेहमीच्या औषधांहून अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि स्वच्छ असलेली प्री-मेडिकेटेड होमिओपॅथिक औषधांची शिफारस करण्यास सुरुवात केली आहे. ही प्री मेडिकेटेड औषधे किंवा बोइरॉन्स ट्युब्स त्यांच्या नावाप्रमाणेच आगळ्या वेगळ्या प्रकारे सीलबंद केलेल्या ट्युबमध्ये पॅक केली जातात आणि त्यांना होमिओपॅथीमधले गोल्ड स्टॅंडर्ड मानले जाते. ट्युबवर आत असलेल्या घटकांची नावे, निदर्शक, बॅच क्रमांक, सुजाण डिझाइन, अंतिम दिनांक आणि एमआरपी आढळून येत असल्याने रुग्णांना आता अधिक पर्याय आणि सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. याहून जास्त म्हणजे उच्च स्तरावरील तांत्रिक प्रकल्पांमध्ये हाताचा स्पर्श होऊ न देता त्यांची निर्मिती केली जाते.
काही डॉक्‍टर्स आता स्वदेशी निर्मितीऐवजी डिस्पेन्सिंग पॅकेज्ड ग्लोबुल्सना पसंती देत आहेत. अर्धपारदर्शक ग्लोबुल्सच्या जागी आता पारंपरिक ठोस पिठूळ ग्लोबुल्स येतात, त्यांच्या पृष्ठभागावर औषधाची एकसमान फवारणी झालेली असते. या नवीन ग्लोबुल्स एकसमान प्रकारे औषधाच्या समान वितरणाची शाश्वती देतात, एकमेकांना चिकटत नाही किंवा त्या औषधाच्या अतिरिक्त द्रवात विरघळत देखील नाहीत तसेच त्यांच्या पृष्ठभागावर अल्कोहोल नसतो. परिणामास्तव त्या विशेष वळण असलेल्या ट्युब्सच्या मार्फत एकावेळी एक अशाप्रकारे निघतात आणि वयस्क लोक तसेच मुले खाली न पाडवता त्यांना सहजपणे घेऊ शकतात. औषधाच्या विरलपणावर अवलंबून या ट्युब्स विविध रंगातील व्हेरिएंट्‌समध्ये येतात, तसेच त्या फार्मास्युटिकल दर्जाच्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या असतात, ज्याची औषधासोबत अभिक्रिया होत नाही.
नवीन स्मार्ट पॅकेजिंग आणि प्रदर्शने रुग्णांद्वारे होमिओपॅथीचा अंगिकार करण्यासाठी अधिक विश्‍वासार्हता आणि शाश्‍वती देतात. होमिओपॅथी औषधे तयार करण्याच्या पारंपरिक पध्दतींमध्ये डॉक्‍टरांद्वारे ग्लोबुल्समध्ये अनाहूतपणे औषधाची गरजेहून अधिक मात्रा घातली जाण्याची शक्‍यता असते. हवेने दूषित होण्याची आणखीन एक जोखीम असतेच. या सीलबंद ट्युब्समुळे रुग्णांना ते घेत असलेल्या औषधाच्या मात्रेची आणि विश्‍वासार्हतेची स्पष्ट खात्री मिळते.
या व्यतिरिक्त आता डॉक्‍टरांनी आपल्या क्‍लिनिकमध्ये ब्रॅंडेड औषधे विकणे बंद केले आहे. पात्रता नसलेल्या लोकांना या औषधांना देण्यापासून निर्बंधित करण्यात आले आहे. डिस्पेन्सर्स आता निर्मात्याने सीलबंद पॅकिंगमधली औषधे विकतात, यामधून ग्लोब्युल्समधली, पाणी किंवा मिल्क शुगरमधली किंवा होमिओपॅथिक डॉक्‍टरांच्या शिफारशीनुसार केलेली औषधे वगळली गेली आहेत. ओटीसी ब्रॅंडेड होमिओपॅथिक औषधे देणाऱ्या फार्मसी आता सुरक्षा, सक्षमता तसेच भारत सरकारच्या वर्तमान नियमांनुसार या औषधांच्या दर्जाची शाश्वती देण्यासाठी आवश्‍यक ती पात्रता असलेल्या लोकांची नियुक्ती करताना आढळतात.
गुड मॅन्युफॅक्‍चरिंग प्रॅक्‍टिसेस (जीएमपी)च्या अनुसरणासोबत, निर्माते आता वापरलेल्या कच्च्या मालाची श्रेणीदेखील स्पष्ट करण्यामार्फत होमिओपॅथिक औषधांच्या स्वरूपाच्या मानक दर्जात सुधारणा करत आहेत. या नवीन उपाययोजनांमुळे शहरातील होमिओपॅथीला पसंती देणाऱ्या लोकांनी आता निश्वास टाकला आहे. सध्या सुटी औषधे विकणारी अनेक दुकाने आहेत, जी यथायोग्य पद्धतींची अजिबात पर्वा करत नाहीत. ग्राहक होमिओपॅथी डॉक्‍टरांनी घटकांची नावे असलेली लेबल्स लावलेली औषधे देण्याची मागणी करतात. उशिरा का असेना, अनेक लोक आता फॅक्‍टरी सीलबंद बाटल्यांमध्ये बनवलेल्या औषधांकडे तसेच प्री सील ट्युब्सकडे वळले आहेत, ज्यांचे उत्पादन बोइरॉन सारख्या जर्मन आणि फ्रेंच कंपन्यांमार्फत केले जाते.
श्री चंद्रप्रभा होमिओ क्‍लिनिकचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अशोक बोंगुलवार म्हणाले, आधुनिक पॅकेजिंग आणि नवीन डिस्पेन्सिंग पध्दती सोबत वाढलेल्या सुरक्षितता, दर्जा तसेच होमिओपॅथी औषधांच्या सक्षमता रुग्णांसाठी जणू वरदानच ठरल्या आहेत. होमिओपॅथिक पध्दती ऍलोपॅथीप्रमाणेच मानकीत बनल्या आहेत, कारण आता रुग्णांना त्यांच्या औषधांसाठी डॉक्‍टरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यांना आता फार्मसींमधून त्यांची औषधे सहज मिळू शकतील.
होमिओपॅथी आजाराचा नव्हे तर आजारपणाचा उपचार करते आणि ते लाइक क्‍युअर्स लाइक या तत्त्वावर आधारलेले आहे. ही औषधांची जगातील दुसऱ्या क्रमांकावरील यंत्रणा असून यामध्ये व्यक्तिगत उपचारावर लक्ष केंद्रित केले जाते. भारतात, होमिओपॅथीचा उपयोग सर्वात जास्त पसंतीची यंत्रणा म्हणून केला जातो मग तो सर्वसामान्य आजार असो किंवा दुर्धर व्याधी असो. होमिओपॅथीक औषधांची माफकता आणि दुष्परिणाम न आढळण्यामुळे ऍलोपॅथिक औषधांच्या तुलनेत या औषधांचे जास्त आकर्षण आहे.
जर योग्य निदान केले गेले, तर आजार तत्काळ बरा करण्याची होमिओपॅथीमध्ये क्षमता आहे. होमिओपॅथी औषधांची सुरक्षा आणि प्रभावीपणा ऍलोपॅथीच्या तुलनेत कितीतरी प्रमाणात जास्त आहे, कारण ती केवळ लक्षणांनुसार नव्हे तर आजाराच्या मुळाशी जाऊन त्याचे कारण शोधतात. प्रतिकार शक्ती त्यांच्यामुळे प्रभावी बनते आणि शरीराला स्वत:हून संक्रमणाचा सामना करण्यासाठी मदत करते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)