हार्दिक पटेल यांचे बेमुदत उपोषण सुरू

संग्रहित छायाचित्र..

गुजरात पुन्हा ढवळून निघण्याची चिन्हे
अहमदाबाद – पाटीदार समाजाचे तरूण नेते हार्दिक पटेल यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी येथे बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांच्या आंदोलनामुळे गुजरात पुन्हा ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.

हार्दिक यांनी उपोषणासाठी विविध स्थळे सुचवली होती. मात्र, त्या स्थळांवर आंदोलन करण्याची परवानगी त्या राज्यातील भाजप सरकारने नाकारली. त्यामुळे हार्दिक यांनी अहमदाबादमधील त्यांच्या फार्महाऊसवरच दुपारपासून उपोषण सुरू केले. त्यावेळी कॉंग्रेसचे बरेच आमदारही उपस्थित होते. हार्दिक यांनी तीन वर्षांपूर्वी याच दिवशी पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रॅलीचे आयोजन केले होते. त्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. तो अनुभव ध्यानात घेऊन गुजरात पोलिसांनी उपोषणस्थळी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आमचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. उपोषणात सहभागी होता येऊ नये यासाठी माझ्या 16 हजार समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, असा आरोप हार्दिक यांनी केला. तर पोलिसांनी केवळ 158 जणांना ताब्यात घेतल्याचा दावा केला. भाजप सरकारने हार्दिक यांचे आंदोलन कॉंग्रेसपुरस्कृत असल्याचा आरोप केला. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन कॉंग्रेसने हार्दिक यांना उपोषण करण्यास सांगितले, असे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)