हायपोटेन्शन समजून घेऊ (भाग२)

हायपोटेन्शन समजून घेऊ (भाग१)

दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड हार्ट डे अर्थात जागतिक हृदय दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने एकविसाव्या शतकातील सर्वांत मोठा आजार असलेल्या हृदयविषयक आजारांबाबत जनजागृती घडवून आणली जाते. जीवनशैलीतील बदल आणि प्रत्येकाला त्याच्या व्यवसायाला साजेशी आहाराची पद्धती याशिवाय त्याने उत्तम हृदयारोग्यासाठी काय करावे, याबद्दल मार्गदर्शन केले जाते. हृदयाचे आरोग्य म्हटले की, सहसा चर्चा होते ती हृदयक्रिया बंद पडणे किंवा उच्च रक्‍तदाबाची. मात्र, लो ब्लड प्रेशरची समस्याही तितकीच महत्त्वाची आहे. त्याकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर होणारे दुष्परिणाम फारच घातक असतात. त्याविषयी… पुढे समजावून सांगताना मी म्हणाले, रक्‍तदाब कमी होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. ती जरी फारशी ठोस नसली तरी गरोदरपण, मद्यपान, शरीराचे तापमान वाढणे / कमी होणे, ऍड्रिनल ग्रंथीतील बिघाड, लघवीनंतर रक्‍तदाबातील बदल (ाळर्लीीींरींळेप ीूपलेशि), सिक सायनस सिन्ड्रोम, हृदय व फुफ्फुसाच्या रक्‍तवाहिन्यांमधील अडथळे, हृदयाच्या आवरणाला आलेली सूज (शिीळलरीवळींळी), यकृताच्या कामातील बिघाड, नाडीचे अनियमित ठोके, काही औषधांचा अतिरेक, जंतूसंसर्ग, संप्रेरकांमधील अडथळे (उदा. थायरॉईड), रक्‍तातील साखरेची पातळी कमी होणे ही काही कारणे आहेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (वशहूवीरींळेप), अतिरिक्‍त प्रमाणातील उपास-तापास, अतिश्रम व थकवा, तीव्र भावना यामुळे देखील रक्‍तदाब कमी होऊ शकतो. जनुकीय जडणघडण, वयोमान, काही औषधे, ऍलर्जी, आहारीय व मानसशास्त्रीय कारणेदेखील यामागे असू शकतात. उच्च रक्‍तदाबासाठी औषधे घेणाऱ्यांमध्ये, मधुमेहींमध्ये व धमनीकाठिण्य असणाऱ्यांमध्ये (विशेषतः वृद्धांमध्ये) या प्रकारचा त्रास दिसून येतो. जेवणानंतर रक्‍तदाब कमी होणे हे जेवणानंतर चक्कर येऊन पडण्याचे नेहमीचे कारण. विशेषतः भरपेट जेवणानंतर व जेवणात भरपूर कर्बोदके घेतल्यानंतर पोटाकडे रक्‍तप्रवाह वळल्यामुळे हे घडते.

रक्‍तदाब कमी होणे जीवावर बेतू शकते का? वृषालीने घाबरतच विचारले. 
तिची भीती लक्षात येऊन मी म्हणाले, रक्‍तदाब अचानकच खूप कमी झाला तर जीवावर बेतू शकते, फार काळ रक्‍तदाब फार कमी राहिला तरी मेंदू, हृदय आणि यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमी रक्‍तदाबाचे कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माझा रक्‍तदाब कमी आहे हे मला कसे कळेल? वृषाली.
तिची काळजी कमी करायचा प्रयत्न करत मी म्हणाले, अगं, रक्‍तदाब कमी असणे म्हणजे नेहमीच काळजीचे कारण नसते. उठून बसताना चक्कर येणे, डोके दुखणे अशी लक्षणे असतील तर कित्येकदा औषधे लागत देखील नाहीत. उभे राहिल्यावर / चालताना तोल जाणे, दृष्टी अंधूक होणे, थकवा, मळमळणे, त्वचा पांढुरकी पडणे अशी लक्षणे देखील रक्‍तदाब कमी झाल्यास दिसू शकतात.

कमी झालेला रक्‍तदाब गंभीर आहे हे डॉक्‍टरांच्या कसे लक्षात येते? वृषालीने चौकसपणे पुढचा प्रश्न विचारला.
डॉक्‍टर सर्वप्रथम तब्येतीबाबत सखोल माहिती विचारतात. यात वय, लक्षणे आणि रक्‍तदाब कमी होण्यास कारणीभूत घटक यांचा समावेश असतो. ते शारीरिक तपासणी करतात, ठराविक काळाच्या अंतराने, झोपले असताना – उठून बसल्यावर / उभे राहिल्यावर – त्यानंतर थोड्यावेळाने रक्‍तदाब व नाडीचे ठोके पाहातात. क्वचितप्रसंगी इ.सी.जी., इकोकार्डियोग्राम, एक्‍सरसाईज स्ट्रेस टेस्ट, इलेक्‍ट्रोफिसिओलॉजी टेस्ट आणि काही रक्‍ततपासण्यांचीही गरज भासू शकते. काही वेळा घरी दिवसा व रात्री रक्‍तदाब तपासणे सुद्धा सांगितले जाते. र्झीीींरश्र हिूींशपीळेप च्या निदानासाठी टिल्ट टेबल टेस्ट केली जाते. यात शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली व स्थितींमधील रक्‍तदाब, नाडीचे ठोके आणि लक्षणे यांचा अभ्यास केला जातो.

रक्‍तदाब कमी होण्याच्या काही विशिष्ट वेळा आहेत का? वृषाली.
महत्त्वाचा प्रश्न विचारलास! याबाबत माहिती असणे फार गरजेचे आहे. खालीलप्रसंगी रक्‍तदाब कमी होण्याची शक्‍यता असते –
बराच काळ झोपून असल्यास (बेड रेस्ट असल्यास) आणि अचानक उठून बसल्यास
गरोदरपणात साधारण पहिल्या 24 आठवड्यांमध्ये
खूप रक्‍तस्त्राव झाल्यास
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास (वशहूवीरींळेप)
उच्चरक्‍तदाबासाठी उपचार सुरू असताना, हृदयासंबंधी, नैराश्‍यासंबंधी काही औषधे सुरू असताना, पार्किन्सन आजाराची औषधे घेत असताना
हृदयविकारांमध्ये, हृदयाच्या झडपांमध्ये बिघाड झाल्यास, हृदयविकाराचा झटका आल्यास.
अंतःस्त्रावी ग्रंथींच्या आजारात उदा –
हायपोथायरॉईडिसम, पॅराथायरॉईड्‌चे आजार, ऍडिसन डिसीज, मधुमेह आणि रक्‍तशर्करा कमी होणे
तीव्र जंतूसंसर्ग
तीव्र ऍलर्जी
मज्जासंस्थेचे विकार
आहारात जीवनसत्व ब-12, फोलिक ऍसिड यांचा आभाव असणे
डॉक्‍टरांना कधी संपर्क करायचा? वृषालीने समजूतदारपणे विचारले.

मी सोपे करून सांगितले, वर दिलेली लक्षणे दिसत असल्यास, वारंवार त्रास होऊ लागल्यास, काही विशिष्ट औषधे सुरू केल्यानंतर रक्‍तदाब कमी होऊन त्रास झाल्यास रक्‍तदाब कायमच कमी राहात असेल आणि लक्षणे नसतील / एखाद्याच वेळेला रक्‍तदाब कमी दिसून आला तर काळजीचे कारण नाही. वेगवेगळ्या वेळी, कालपरत्वे रक्‍तदाब कमी- जास्त होणे साहजिक आहे. अशावेळी आपले शरीर तो रक्‍तदाब पूर्वपदाला आणते.

पण जेव्हा पुनःपुन्हा त्रास होतो, अचानक रक्‍तदाब कमी होऊन चक्कर येते, कमी रक्‍तदाबाचे कारण कळत नाही अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम! तज्ज्ञ कारण शोधून त्यावर उपाय करतात. ज्या व्यक्तींचा रक्‍तदाब खूपच जास्त कमी होतो, त्यांना रक्‍तदाब नियंत्रित करून वेगवेगळ्या अवयवांचा रक्‍तपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीची मदत लागते. रक्‍तदाब कमी होणे हा प्राथमिक (शरीरातील प्रतिक्षिप्त क्रियांमधील बिघाडामुळे) आहे द्वितीयक (इतर काही कारणामुळे घडलेला) आहे हे शोधणे महत्त्वाचे असते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)