हायपोटेन्शन समजून घेऊ (भाग३)

हायपोटेन्शन समजून घेऊ (भाग२)

दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड हार्ट डे अर्थात जागतिक हृदय दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने एकविसाव्या शतकातील सर्वांत मोठा आजार असलेल्या हृदयविषयक आजारांबाबत जनजागृती घडवून आणली जाते. जीवनशैलीतील बदल आणि प्रत्येकाला त्याच्या व्यवसायाला साजेशी आहाराची पद्धती याशिवाय त्याने उत्तम हृदयारोग्यासाठी काय करावे, याबद्दल मार्गदर्शन केले जाते. हृदयाचे आरोग्य म्हटले की, सहसा चर्चा होते ती हृदयक्रिया बंद पडणे किंवा उच्च रक्‍तदाबाची. मात्र, लो ब्लड प्रेशरची समस्याही तितकीच महत्त्वाची आहे. त्याकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर होणारे दुष्परिणाम फारच घातक असतात. त्याविषयी… 

कमी रक्‍तदाबासाठी काय उपचार आहेत? वृषालीने पुढे विचारले.
हे सर्वस्वी त्यामागच्या करणावर अवलंबून आहे. पण तातडीने करता येण्याजोग्या काही गोष्टी आहेत-
पाय हृदयाच्या पातळीच्या वर येतील असे (पायाखाली उशी ठेवून) झोपणे
द्रवपदार्थांचे सेवन करणे
बराच काळ उभे राहणे टाळणे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बऱ्याच व्यक्तींमध्ये दीर्घकालीन कमी रक्‍तदाब जीवनशैलीत काही बदल करून सुधारता येतो. लक्षणांनुसार डॉक्‍टर पुढील उपाययोजना सुचवतात-
आहारातील मीठाचे प्रमाण वाढवणे, काळे मीठ व सैंधव मिठाचा वापर करणे
मद्य सोडून इतर द्रवपदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवणे (विशेषतः थंडी-तापाने आजारी असताना, हवामान गरम असताना)
मद्यपान कमी / बंद करणे
तुमची औषधे पाहून गरज पडल्यास ती बदलणे / बंद करणे
नियमित व्यायाम करणे
उठून बसताना / उभे राहताना काळजी घेणे, सावकाश उठणे, उठण्यापूर्वी काही वेळ
पायाची – घोट्यांची हालचाल करणे.
झोपून उठताना एकदम उभे न राहता आधी पलंगाच्या कडेवर काही क्षण बसणे, मग उभे राहणे.
पलंगाच्या डोक्‍याकडच्या भागाखाली विटा ठेवून तो भाग उंच करणे.
जड सामान न उचलणे.
स्वच्छतागृहात फार काळ न रेंगाळणे व फार जोर न देणे.

एका जागी फार काळ उभे न राहणे. दर 15-20 मिनिटांनी हालचाल करणे, चालणे.
फार काळ पाण्याच्या संपर्कात न राहणे (शॉवरखाली, स्पा मध्ये). चक्कर आल्यास खाली बसणे. गरज पडल्यास अशा ठिकाणी खुर्ची ठेवणे.
एकावेळेस कमी खाणे. आहारातील
कर्बोदके कमी करणे. खाल्यानंतर जरा विश्रांती घेणे. उच्च रक्‍तदाबाचे उपचार सुरू असतील तर खाण्याआधी गोळ्या न घेणे.

गरज भासल्यास पोटऱ्या आणि मांड्यांना आधारासाठी इलॅस्टिक सपोर्ट  वापरणे. यामुळे पायांकडचा रक्‍तप्रवाह व पर्यायाने रक्‍तदाब नियंत्रित राहतो.
इतकी माहिती घेतल्यानंतर वृषालीचे समाधान झाले. शेवटी ती सारांशरूपात म्हणाली, रक्‍तदाब कमी होणे हे आपल्या कल्पनेपेक्षा अधिक प्रमाणात (सर्वसामान्यपणे) दिसून येते. बहुतांशी हे गंभीर नसले आणि काही लक्षणे नसली तरी रक्‍तदाब नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)