हायटेक गॅझेट आणि घराची देखभाल (भाग-१)

हायटेक गॅझेटस्‌ने प्रत्येक कठीण काम सोपे केले आहे. घराची स्वच्छता करण्याऱ्या झाडूची जागा आता हायटेक आणि उच्चतांत्रिक गॅजेटस्‌नी घेतली आहे.

व्हॅक्‍युम क्‍लीनर-
व्हॅक्‍युम क्‍लीनर येऊनही काळ लोटला आहे, पण या छोट्या उपकरणाने खूप सोय झाली आहे. झाडूने एखाद्या खोलीची स्वच्छता करण्यासाठी जितका वेळ लागतो तेवढ्या वेळात व्हॅक्‍युम क्‍लीनर 3-4 खोल्यांची स्वच्छता करते. एकाच व्हॅक्‍युम क्‍लीनरने अनेक कामे व्हावी असे वाटत असल्यास मल्टीपल क्‍लिनिंग व्हॅक्‍युम क्‍लीनर खरेदी करावे.
यामध्ये सुक्‍या कचऱ्याबरोबर पाण्याचे कामही करता येते. तसेच त्यात असलेल्या दर्शकामुळे कचऱ्याची पिशवी पूर्ण भरली असेल तर त्याची माहितीही मिळते. व्हॅक्‍युम क्‍लीनर मुळे प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता करायची असेल तर साईड ब्रश आहे का हे देखील तपासून घ्यावे. एकदा हे रिचार्ज केले की 2 तास आपल्याला काम करता येते.

फरबॉल व्हॅक्‍युम क्‍लीनर-
हल्ली फरबॉल व्हॅक्‍युम क्‍लिनरला खूप जास्त मागणी आहे. रंगीत असल्याने ते खूप आकर्षकही दिसते.
फुटबॉलसारखे हे व्हॅक्‍युम क्‍लीनर आपोआपच संपूर्ण घरात बॉलसारखे फिरत फरशीची साफसफाई करते. याचा वापर करून घरातील छोट्या खोल्यांची स्वच्छता करता येते. त्याचबरोबर लाकडी जमीन असेल तर त्याची स्वच्छताही उत्तम प्रकारे करते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑटोमॅटिक फ्लोअर मॅप-
हे मशीन जमिनीवर पडलेला कचरा पहिल्यांदा स्वच्छ करते आणि मग फरशीही पुसून घेते. फरशी पुसून घेण्यासाठी त्यात थोडे पाणी भरावे लागते. ज्या कोपऱ्यामध्ये आपला हात पोहोचू शकत नाही तिथेही हे मशीन सहजपणे पोहोचते. बॅटरी चार्ज करून घेतली की 2 तास हे मशीन सुरू राहाते.

मोपेड व्हॅक्‍युम-
फ्लोर मॅपप्रमाणे मोपेड व्हॅक्‍युमदेखील केर काढणे आणि फरशी पुसणे दोन्ही कामे करते. लहान खोलीच्या स्वच्छतेसाठी हे मशीन उत्तम आहे. पण खोल्या मोठ्या असतील तर मात्र फ्लोअर मॉपच खरेदी करावे. एकदा चार्ज केल्यानंतर हे मशीन 6 तास काम करते.

हे मशीन स्वतः चालवावे लागत नाही तर वेळ ठरवून दिले की ते स्वतःच काम करते संपूर्ण काम झाल्यावर थांबते. दिसायलाही हे मशीन अत्यंत आकर्षक आहे. त्यामुळे वापर करून झाल्यानंतर एखाद्या सजावटीच्या वस्तूसारखे हे वापरू शकतो.

फ्लोअर वॉशिंग-
लाकडी जमीन असल्यास ती धुवावी लागत नाहीच. झाडू आणि पुसून घेतली तरीही स्वच्छ होते, पण जमीन कडक असेल आणि ती चमकवायची असेल तर ती स्वच्छ धुणे गरजेचे असते. अशा वेळी खोलीची स्वच्छता करण्याऐवजी फ्लोर वॉशिंग मशीनचा वापर करू शकता. हे मशीन तीन टप्प्यात काम करते.

यात पहिल्यांदा कचरा साफ करते आणि मग पाण्याच्या मदतीने फरशी भिजवून स्वच्छ ठेवावी त्यानंतर शेवटी ओली फरशी पुसून सुकवली जाते. त्यामुळे फरशी धुण्यासाठी साबण पावडर आणि प्लॅस्टिकच्या झाडूचा वापर करावा लागणार नाही.

– विजयालक्ष्मी साने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)