हाफिझ सईदवरील खटला पाकिस्तानला महागात पडेल – असद दुर्राणी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – हाफिझ सईदवर खटला चालवल्यास तो पाकिस्तानला महागात पडेल असा इशारा आयएसआयचे माजी प्रमुख असद दुर्राणी यांनी दिला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफिझ सईद याच्यावर खटला चालवण्याच्या फंदात पाकिस्तानने पडू नये असे असद दुर्राणी यांनी आपल्या नवीन पुस्तकात म्हटले आहे. जर तसा खटला चालवला, तर तो पाकिस्तान चालवत नसून भारत चालवत आहे असाच अर्थ लोक काढतील, असे ते म्हणतात.

हाफिज सईद निर्दोष आहे, आणि तुम्ही त्याला विनाकारण अडकवत आहात असेच समजले जाईल आणि या गोष्टीची राजकीय किंमत मोठी असेल. असद दुर्राणी यांनी आपल्या ” द स्पाय क्रोनिकल्स-रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ या पुस्तकात भारत आणि पाकिस्तान संबंधित अनेक मुद्यांवर चर्चा केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत कोणत्यानी भारतीय वा पाकिस्तानी एजन्सीसमोर हजर राहून हे कोणाचे काम आहे हे आपण सांगू शकू असे त्यांनी म्हटले आहे. हे काम सरकारसाठी केलेले असो, प्रायोजित असो, आयसएसआयसाठी असो वा लष्करासाठी असो; ते करणाराला पकडून शिक्षा करण्यात आली पाहिजे. असे असद दुर्राणी यांनी आपल्या पुस्तकात म्हटलेले आहे.

हाफिज सईदच्या दहशतवादी कारवायांमुळेच अमेरिकेने त्याच्यावर एक कोटी डॉलर्सचे इनाम लावलेले आहे. आणि अमेरिकेच्या दबावामुळेच पाकिस्तान सरकारने त्याला नजरकैदेत ठेवण्याचे नाटक केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)