हाफिज सईदच्या भ्रमाचा भोपळा फुटला

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. त्याने पाठिंबा दिलेल्या अल्ला-हू-अकबर तेहरिक पक्षाचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचे स्पष्ट झाले. बऱ्याच दहशतवादी संघटना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या.

मात्र, त्यांना कुणालाच खाते उघडता आले नाही. मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांचा (26/11) सूत्रधार असणारा हाफिज पाकिस्तानात समाजसेवक असल्याच्या आवेशात उजळ माथ्याने वावरतो. यावेळी राजकीय आकांक्षा उफाळून आलेल्या हाफिजचे अनेक समर्थक निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळची पाकिस्तानमधील निवडणूक दहशतवादी संघटनांच्या सहभागामुळे वादग्रस्त ठरली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इम्रानऐवजी वासिम अक्रमचे फुटेज
पाकिस्तानमधील निवडणूक निकालाची बातमी दाखवताना बीबीसी वाहिनीचा मोठाच घोटाळा झाला. बीबीसीने इम्रान खान यांच्याऐवजी त्यांच्या क्रिकेट संघातील सहकारी वासिम अक्रमचे फुटेज प्रसिद्ध केले. त्याबद्दल बीबीसीकडून तातडीने दिलगिरीही व्यक्त करण्यात आली.

मात्र, बीबीसीने केलेली गफलत सोशल मीडियावर चर्चेचा आणि खिल्लीचा विषय ठरली. काही महिन्यांपूर्वी बीबीसीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही अशीच चूक केली होती. लंडनमध्ये राष्ट्रकुल परिषद झाली. त्यावेळी त्या वाहिनीने कारमधून परिषदस्थळी दाखल झालेल्या श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांचा उल्लेख मोदी म्हणून केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)