हात पाय मनगट कटीभागाला उत्तम व्यायाम देणारे- गजराज हास्यासन

गजराज हास्यासन हे दंडस्थितीतील हास्यासन आहे. गजराज म्हणजे हत्ती. हत्ती जसा सोंड हलवून डौलदारपणे पाऊले टाकतो त्याच पद्धतीने आपण हे आसन करायचे आहे.

पदंडस्थिती घ्यावी.

पदोन्ही पायात अंतर घ्यावे.
पडावा पाय पुढे घेऊन पाऊल वळवावे.
-त्याचवेळी श्‍वास घेत डाव्या हाताला उजव्या हाताला पकडून उजव्या हाताची सोंडेसारखी स्थिती करावी.
-श्‍वास घेत घेत उजवा हात जास्तीत जास्त डोक्‍यापर्यंत नेताना हाऽ हाऽ हाऽ म्हणत हात उचलून हलवावा.
-एकदा डावा पाय पुढे घेऊन उजव्या हाताने वर ललकारी द्यावी.
-एकदा उजवा पाय पुढे घेऊन डाव्या हाताने वर उचलून हत्तीसारखी हाऽ हाऽ ललकारी द्यावी आणि हे करत पाऊले टाकत चालावे.

या आसनस्थितीत चालताना तोंडाने आवाज करावा. म्हणजे श्‍वास सोडावा अशाप्रकारे दोन्ही हाताना गरूडासनाचा फायदा मिळतो व तसेच एकटक जो हात आपण उंचावून त्याच्या मध्यमेकडे म्हणजेच मधल्या बोटाकडे एकटक पहात ललकारी द्यावी.

या गजराज हास्यासनामुळे हातापायांचे स्नायू मजबूत होतात. शरीर आणि मनाचा हास्यामुळे ताण जातो. मेंदूतील सकारात्मक संप्रेरके जागृत होतात. त्यामुळे आनंदी आवस्था प्राप्त होते. पाठीला बाक दिल्यामुळे पाठीच्या काण्यालाही व्यायाम होतो. हाताची सोंड भरभर खाली केल्यामुळे हाताची बोटांनाही व्यायाम होतो. उजव्या हाताने डावा कान पकडून डावा हाता उजव्या हातावरून सोंडेसारखा पुढे काढतो.
हे करताना कमरेतून वाकतो. काटकोनात कंबरेत झुकूनही हे गजराज हास्यासन करता येते. या आसनामुळे हातांना, मनगटांना, खांद्यांना, पायांना, तसेच कंबरेलाही व्यायाम उत्तम मिळतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.