हात जोडून दंडवत घालतो, पण आंदोलन मागे घ्या – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – मराठा आरक्षण आंदोलनावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्याच्यावर जोरदार टीकेची झोड उठली. मराठा आंदोलनात काही समाज विध्वंसक लोक घुसले आहेत. हे मी बोललो मात्र त्याचा गैर अर्थ काढला जातोय.

माझा तो उद्देश नव्हता, माझ्या वक्तव्याचा विपर्यास्त करून आंदोलन भडकवले जात आहे. त्यामुळे जरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हात जोडून साष्टांग दंडवत घालतो, पण आंदोलन मागे घ्या, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सांगली महापालिकेच्या निवडणूक निमित्ताने मिरजेत प्रचारा दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना जाहीर माफी मागितली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)