अक्षय कुमारचा “केसरी’सध्या बॉक्स ऑफिसवर हिट चालला आहे. त्याच्याकडे आणखीही काही प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे अक्षय सध्या बॉलिवूडमधील सर्वात बिझी ऍक्टर बनला आहे. त्याच्याकडील अन्य प्रोजेक्टपैकी “हाऊसफुल्ल 4′ हा एक महत्वाचा सिनेमा आहे. या सिरीजमधील या चौथ्या सिनेमामध्ये अक्षय 16 व्या शतकातील एका महाराजाच्या रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे दोन वेगवेगळे प्लॉट असणार आहेत. त्यातील एक सध्याच्या कालखंडातील असेल, तर दुसरा 16 व्या शतकातील फ्लॅशबॅक असणार आहे.
रितेश देशमुख आणि बॉबी देओल अक्षयच्या दरबारातील सरदार आणि कृति खरबंदा, कृति सेनॉन. पूजा हेगडे या तिघीजणी राजकुमारी म्हणून दिसणार आहेत. या शिवाय चंकी पांडे वास्को द गामाच्या भाच्याच्या रोलमध्ये असेल. या ऐतिहासिक पार्श्वभुमी असलेल्या सिनेमाला बॉलिवूडचा जोरदर तडका असणार आहे, हे तर उघडच आहे. “हाऊसफुल्ल 4’मध्ये जॉनी लिव्हर, राणा दग्गुबत्ती यासारख्या अन्य विनोदवीरांचीही जंत्री असणार आहे. त्यामध्ये काय काय धमाल येणार आहे, हे प्रत्यक्ष पडद्यावरच बघायला हवे.