हस्तिदंत विक्री; चौघे जेरबंद

दत्तवाडी पोलिसांची कारवाई : दोन हस्तिदंत जप्त

पुणे – सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशापांडे उद्यानाजवळ हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन हस्तिदंत जप्त करण्यात आले आहेत.

आदित्य संदीप खांडगे (वय 19, रा. आळंदी), ऋषिकेश हरिशचंद्र गायकवाड (वय 28, रा. वाकड), अनिकेत चंद्रकांत अष्टेकर (वय 26) आणि अमित अशोक पिस्का (वय 28, दोघेही, रा. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 कलम 9, 44,49(4),52 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांना बातमीदारामार्फत याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, हवालदार रवींद फुलपगारे, सुधीर घोटकुले, पोलीस नाईक सोमेश्‍वर यादव, महेश गाढवे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वाबळे, शरद राऊत, अमोल लोहार, सागर सूतकर यांची टीम तयार केली. वन विभागाला त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर पथकाने वन विभागाच्या अधिकारी आणि पंचासोबत साध्या वेषात व्यावसायिकांचे वेषांतर करून सापळा रचला. काही वेळाने चार व्यक्‍ती त्या ठिकाणी गेल्या. त्यापैकी एकाच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग होती. त्याकडे संशयीत हस्तीदंत असल्याचे खबऱ्याने सांगताच पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ हे पुढील तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, हवालदार रवींद्र फुलपगारे, सुधीर घोटकुले, श्रीकांत शिरोळे, सोमेश्‍वर यादव, महेश गाढवे, कुणाल माने, रोहन खैरे,अक्षय वाबळे, शरद राऊत, सागर सुतकर, अमोल लोहार, महेश गिरी, आदिनाथ देवकर यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.