हवेलीतील आर्थिक उलाढालीला गती

लोणीकाळभोर- पुरंदर तालुक्‍यातील प्रस्तावित आंतराष्ट्रीय विमानतळ यासह पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, रिंगरोड यासह पुणे-सोलापूर महामार्गाचे झालेले रूंदीकरण या दळण-वळणाच्या सुविधांच्या पार्श्‍वभूमीवर पूर्व हवेलीतील आर्थिक उलाढालीला गती मिळत असल्याचे चित्र आहे. शिरूर, दौंड आणि पुरंदर तालुक्‍याच्या सिमा असलेला हा तालुका पुणे शहरालगत असल्याने या भागात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा शिरकाव झाला असून नागरिकरण वेगाने होत असल्याने आर्थिक उलाढालीला गती मिळू लागली आहे.
पुणे शहरालगत असलेल्या हवेली तालुक्‍यातील अनेक गावांची उपनगरं झाली आहेत. यामध्येही पूर्व हवेलीतील गावांचा समावेश अधिक आहे. लगतच्या पुरंदरमध्ये आंतराष्ट्रीय विमानतळ जवळपास निश्‍चित झाले आहे. तालुक्‍यातून जाणाऱ्या रेल्वे लोहमार्ग विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. यातून सुरू होत असलेली विद्युत लोकल आणि यातून चाकरमान्यांची पुणे शहरात येण्या-जाण्याकरिता प्रवासाची झालेली सोय यासह याच भागातून जाणारा रिंगरोड यामुळे या भागाचे नागरिकरणही वेगाने होत आहे.
आंतराष्ट्रीय विमानतळ तसेच रिंगरोड यामुळे पूर्व हवेलीत भांडवलदारांकडून गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असून, जॉईंट व्हेंचरनुसार शेतकऱ्यांशी संलग्न होऊन गृहप्रकल्प उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे-दौंड लोहमार्गालगत असलेल्या उरुळीकांचन, लोणी काळभोर यासह यवत, केडगाव, पाटस या लगतच्या भागातही सर्वसामान्यांकडून गुंतवणूक होत आहे. महामार्ग तसेच लोहमार्ग यामुळे पुणे ते उरुळीकांचन हा 30 कि.मी. अंतराचा टप्पा पंधरा मिनिटे, तर पुणे ते दौंड हा टप्पा 30 ते 45 मिनिटांत पार करणे शक्‍य होणार आहे. तसेच यादरम्यान रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढणार असल्याने या भागातून पुणे अथवा मुंबई येथे प्रवास करणे सहजशक्‍य होणार आहे. यामुळे परिसरातील प्रमुख गावांभोवती गोडावून, मालधक्के अशा व्यावसायांना चालना मिळत आहे. यातूनच नोकरी, रोजगार उपलब्ध झाल्याने नागरिकरणाचा वेगही अधिक आहे.

  • रोजगार वाढीलाही वेग येणार….
    पूर्व हवेलीतील गावांत उलाढाल वाढत असल्याने या भागात रोजगारीच्या संधीही वाढली आहे. रोजगारासाठी येथे येणाऱ्यांची संख्या वाढून नागरिकरणही झपाट्याने वाढत आहे. सध्या, पुणे शहरावर पडणारा नागरिकरणाचा ताण आता दळण-वळणाच्या सुविधेमुळे पूर्व हवेली तालुक्‍यात सामावणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)