हवाईदलाच्या विमान दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू

बंगळुरु: भारतीय वायू सेनेचे मिराज-2000 हे प्रशिक्षक विमान शुक्रवारी बंगळुरुमधील हिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स लिमिटेड विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. विमानातील स्फोटानंतर लागलेल्या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.

सुरक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मिराज 2000 या प्रशिक्षक विमानाने अपग्रेड केल्यानंतर उड्डाण केले होते. मात्र काही वेळातच बंगळुरुच्या एचएएल विमानतळावर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
स्क्वॉड्रन लीडर समीर अब्रोल आणि स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ नेगी अशी मृत्यू झालेल्या वैमानिकांची नावे आहेत. दुर्घटनेत एक वैमानिक पूर्णपणे भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या एका वैमानिकाला सेनेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर विमानाने पेट घेतला आणि घटनास्थळी सर्वत्र धूर पसरला होता. काही वेळात पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि विमातळवरील कर्मचाऱ्यांनी विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर वैमानिकांना बाहेर काढण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)